दोडामार्ग :
दोडामार्ग तालुक्यातील एका खासगी डॉक्टरविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार गोव्यातील एका महिलेने केली आहे. औषधोपचाराच्या नावाखाली या डॉक्टरने आपले जवळपास २ लाखांची फसवणूक केल्याचे या महिलेने या तक्रारीत म्हटले आहे. अन्य बर्याच जणांची डॉक्टरने फसवणूक केल्याचे सदर महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातील एक महिला मूल होत नसल्याने आपल्या साटेली-भेडशी नातलगाच्या माध्यमातून ह्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती. ही महिला फेब्रुवारी महिन्यात सा भेडशी येथील या डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली, तेव्हा सदर डॉक्टरने औषधे दिली. सुरुवातीला या महिलेने पाच हजार रुपये दिले. त्यानंतर चाळीस हजार रुपये दिले. त्यानंतर मार्च महिन्यात हा डॉक्टर इतर रुग्ण बघायचे आहे. हे कारण सांगून या महिलेच्या पर्वरी येथील घरी आला. सोबत त्याने काही औषधे इंजेक्शन देखील आणली होती.
त्या दरम्यान सदर महिलेने एका बँकेचा चेक सही करून ठेवला होता. मात्र त्यावर रक्कम लिहीली नव्हती. महिला घरात गेल्याची संधी साधून त्या डॉक्टरने जवळजवळ दीड लाख रुपयांची रक्कम या महिलेच्या खात्यातून काढली. हा चेक एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या पणजी – गोवा शाखेतील होता. त्यानंतर सदर डॉक्टर विविध कारणे सांगून घरी येण्याचा प्रयत्न करीत होता व तुमचा रिपोर्ट चांगला येणार असून तुम्हाला शंभर टक्के मुले होईल, असे सांगायचा. दरम्यान आपल्या खात्यातून रक्कम काढली हे लक्षात येतात या महिने त्या डॉक्टरला फोन केला तर तो फोन घेण्यास टाळाटाळ करू लागला. तसेच अलीकडेच त्यांनी आपला नंबर देते ब्लॉक केला आहे.
आपण त्या डॉक्टरला कुठल्याही प्रकारचे चेक दिलेले नसून त्यांनी आपली नजर चुकवून नेला आहे. जवळपास आपली २ लाखाची फसवणूक या डॉक्टरने केल्याचे या महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या प्रमाणे साटेली-भेडशी परिसरातील अनेक महिलांची या डॉक्टरने फसवणूक केली असून फेब्रुवारी ते मे महिन्यात दरम्यान सुरू असलेला हा दवाखाना आता बंद आहे. कारण त्याला फोन केला असता दुसरेच कोणीतरी व्यक्ती बोलते आणि डॉक्टर मेल्याचे सांगते. ते पाहता या प्रकाराची चौकशी करून संबंधित डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याची तसेच आपली रक्कम मिळवून देण्याची मागणी या महिलेने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक सौ. आर. जी. नदाफ यांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.