कुडाळ एसटी स्टॅन्ड मधील डांबरीकरणाचे काम आमदार निधीतून करावे – जेडी नाडकर्णी

कुडाळ एसटी स्टॅन्ड मधील डांबरीकरणाचे काम आमदार निधीतून करावे – जेडी नाडकर्णी

कुडाळ

सध्या करोना च्या भयाण परिस्थितीमुळे एसटी चा व्यवसाय डबघाईला आला असून, त्यामुळे कुडाळ एसटी स्टँड मधील काम अर्धवट पडून राहिले आहे.
पावसाळ्यामध्ये अक्षरशः तिकडची जागा चिखलमय झालेली आहे. प्रशासनाकडे वारंवार लेखी तसं तोंडी स्वरूपात सांगून सुद्धा एसटी प्रशासन हतबल झालेले आहे. त्यामुळे सदर काम हे स्थानिक आमदाराच्या निधीमधून करून घ्यावे असे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी आहे.

लवकरात लवकर ते काम न झाल्यास सदर काम हे विरोधी पक्षाच्या आमदाराच्या निधीमधून करून घ्यायची विनंती महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना च्या वतीने एक लेखी स्वरूपाचे निवेदन दुसऱ्या विरोधी पक्षाच्या आमदाराला देण्यात येईल व त्यासंदर्भातले पत्र हे मा. श्री हरी माळी साहेब त्यांच्या आदेशाने देण्यात येणार असल्याचे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा