You are currently viewing शिक्षण व सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व विकासभाई सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन…

शिक्षण व सहकारातील अभ्यासू व्यक्तिमत्व विकासभाई सावंत वाढदिवस अभिष्टचिंतन…

♦️काँग्रेसचे जेष्ठ नेते सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे पुत्र विकास सावंत यांचा आज वाढदिवस. काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण आणि सहकारातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले विकास सावंत शिक्षण क्षेत्रातही आपले महत्वपूर्ण योगदान देत आहेत.
♦️सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कुल आणि महाविद्यालय हे गेली अनेक वर्षे ते सावंतवाडीत चालवीत आहेत. तसेच शांतिनिकेतन इंग्रजी माध्यमाची शाळा सावंतवाडीत सुरू केली असून दोडामार्ग मध्येही ते इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करत आहेत. तालुक्यातील मुलांच्या शैक्षणिक सुविधांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. सावंतवाडीतील गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा ते मदत करत असतात.
♦️सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मध्येही सदस्य आरोग्य व शिक्षण सभापती म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. जिल्हापरिषदेवर शिवसेनेची पहिल्यांदाच सत्ता आली तेव्हा विरोधी सदस्य असूनही शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत. जिल्हा बँकेचे एक अभ्यासू संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. जिल्हा बँकेवरही त्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे. जवळपास ३२ वर्षे सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात देखील उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
♦️शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात, राष्ट्रवादीत त्यांना येण्यासाठीही आग्रह करण्यात आला होता. राष्ट्रवादीतून त्यांना विधानसभेचीही ऑफर देण्यात आली होती तेव्हा काँग्रेसचे निष्ठावान म्हणून त्यांनी ती नाकारली. विधानसभा उमेदवार म्हणून काँग्रेसची त्यांना उमेदवारी मिळाली होती. नैतिकतेमुळे बदलत्या राजकारणात त्यांचा प्रभाव पडला नाही. जिल्हा नियोजनचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
♦️काँग्रेसच्या पडत्या काळात विकास सावंत यांनी पक्ष सावरला, पक्षानेही जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. परंतु अंतर्गत धुसफूस होऊ लागल्याने त्यांनी जिल्हाध्यक्ष पद सोडून कार्यकर्ता म्हणून राहणे पसंद केले.
♦️काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या विकास सावंत यांचा आज जन्मदिवस… संवाद मिडियाकडून विकास सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा