You are currently viewing सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाडीला अपघात…

सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाडीला अपघात…

मळगाव येथील घटना;परब यांना किरकोळ दुखापत,गाडीचे नुकसान…

सावंतवाडी

येथिल नगराध्यक्ष संजू परब यांच्या गाडीला अपघात झाला आहे.ही घटना आज तीन वाजण्याच्या सुमारास मळगाव येथे झाराप-पत्रादेवी महामार्गावर घडली.मागून येणाऱ्या गाडीने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.सुदैवाने या गाडीतून प्रवास करणारे नगराध्यक्ष श्री.परब व त्यांचे सहकारी बंटी पुरोहित यांना कोणतीही दुखापत झाली नाही.याबाबतची माहिती श्री.पुरोहित यांनी दिली.

आज सभापती निवड असल्यामुळे श्री परब आपल्या सहकार्‍यां समवेत ओरोस येथे जात होते. त्यावेळी मळगाव येथे गेले असता मागून येणाऱ्या ब्रेजा कारने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर चढली सुदैवाने किरकोळ दुखापत झालेली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 2 =