१० वर्षा पूर्वीच्या वेंगुर्ल्याच्या राड्याची मोठेपणा सांगणाऱ्या तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक त्यावेळी आपण नेमके कुठे होता…

१० वर्षा पूर्वीच्या वेंगुर्ल्याच्या राड्याची मोठेपणा सांगणाऱ्या तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक त्यावेळी आपण नेमके कुठे होता…

मनवीसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

शिवसैनिक आणि शिवसेनेचे तत्कालीन आमदार परशुराम उपरकर १० वर्षांपूर्वीच्या वेंगुर्ला राड्याचा सामना करत असताना ऐनवेळी बाजूला जाणारे आमदार वैभव नाईक आज त्याच राड्याचा मोठेपणा मारत आहेत. वेंगुर्ला राड्यात सामान्य जनता आणि शिवसैनिक अडचणीत असताना जी.जी उपरकर हे निडरपणे जिवाची पर्वा न करता शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहिले व त्यांनी शेवटपर्यंत शिवसेनेचा गड शिवसेनेची शाखा सोडली नाही. तर याउलट तत्कालीन जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक हे ज्यावेळी त्यावेळचे पालकमंत्री नारायण राणे, त्यावेळचे खासदार आणि त्यांचे समर्थक शिवसेना शाखेवर चाल करुन आले त्याच्या काही वेळ अगोदरच वैभव नाईक यांनी तिथुन का निघून गेले. तर याउलट त्यावेळी शिवसैनिकांना आणि वेंगुर्ल्याच्या सामान्य जनतेला त्रास देणाऱ्या राडेबाजांना कठोर शासन होण्याकरता आजही बाळासाहेबांचा कडवा शिलेदार राज साहेबांच्या नेतृत्त्वात मा. हायकोर्टात लढतो आहे.
आमदार वैभव नाईकांनी १००रु चे पेट्रोल वाटप आंदोलन तेही वेळेच बंधन ठेवून त्यात राड्याचा स्टंट यापेक्षा अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे सद्ध्याची कोरोना परिस्थिती आणि भविष्यात आपल्याच शासनाच्या म्हणण्यानुसार तिसरी लाट यासाठी ठोस उपाययोजना करावी.व या कोरोना कालावधी नंतर जिल्ह्यातील सामान्य नागरिकांन समोर उद्भवणारा बेरोजगारीचा प्रश्न, एक सत्ताधारी पक्षा आमदार म्हणून तीन तासांचा १००रु पेट्रोल वाटप कार्यक्रम करून हे प्रश्र्न सुटणार नाहीत.
तसेच आमदार वैभव नाईक आपण सत्तेचा दुरूपयोग करून पोलीसांवर दबाव आणून आपल्या पगारी माणसाच्या नावे माझ्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल करा आम्ही सोशल मीडिया तसेच प्रिंट मिडियाच्या माध्यमातून आपण करत असलेल्या फसव्या घोषणा आणि नुसत्याच कागदोपत्री निधी -विकासकामे यांची पोल जनतेसमोर करतच राहू

प्रतिक्रिया व्यक्त करा