You are currently viewing मळेवाड कोंडुरे गावातील बचत गटांना ग्रा.पं. कडून सेलम हळद बियाणे वाटप

मळेवाड कोंडुरे गावातील बचत गटांना ग्रा.पं. कडून सेलम हळद बियाणे वाटप

सावंतवाडी

मळेवाड कोंडूरे गावातील बचत गटांना ग्रामपंचायत कडून सेलम हळद बियाणे मोफत वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतात हळद पीक उत्पादन करावे या उद्देशाने ग्रामपंचायत कडून गावातील 60 बचत गटांना मोफत सेलम हळद बियाणे वाटप करण्यात आले.

या वाटपा वेळी सरपंच हेमंत मराठे यांनी महिलांना मार्गदर्शन करत असताना हळदीचे जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासाठी मेहनत घ्या. तसेच महिलांसाठी पशुपालन, कुकुटपालन, शिवणकाम अशा व्यवसायांसाठी ग्रामपंचायत कडून सहकार्य केले जाणार आहे असे सांगितले, तसेच जो बचत गट हळदीचे जास्त उत्पादन करेल त्या पहिल्या तीन बचत गटांना प्रथम, द्वितीय, व तृतीय बक्षीस देऊन सन्मानित केले जाईल.

तसेच उत्तेजनार्थ तीन बचत गटांना बक्षिसे दिली जातील. त्याच प्रमाणे ज्या सीआरपीकडील बचत गट हळद उत्पादन जास्त करतील त्या सीआरपी ना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असेही सरपंच मराठे यांनी सांगितले. या वाटप प्रसंगी सरपंच हेमंत मराठे, ग्राम विस्तार अधिकारी अनंत गावकर, ग्रा पं सदस्य सानिका शेवडे अमोल नाईक, स्नेहल नाईक, रश्मी रेडकर, वैष्णवी मुळीक,तेजश्री पेडणेकर, इशा काळोजी, प्राची मुळीक, हिरालाल पावरा आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − three =