सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 83 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 60 पूर्णांक 6 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 841.73 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 83(936), सावंतवाडी – 76.20(983.7), वेंगुर्ला – 46.6(663.2), कुडाळ – 56(735), मालवण – 70(836), कणकवली – 60(933), देवगड – 19(739), वैभववाडी – 74(908), असा पाऊस झाला आहे.