You are currently viewing २१ आणि २२ रोजी डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचा २० वा वर्धापन दिन

२१ आणि २२ रोजी डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीचा २० वा वर्धापन दिन

सावंतवाडी :

 

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली डिसेंबर २१ आणि २२ रोजी २० वा वर्धापन दिन साजरा करत आहे.वर्धापन दिनानिमित्त डिसेंबर २१ रोजी संध्याकाळी ०६ ते ०९ या वेळात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास वन अधिकारी श्री. एस. नवकिशोर रेड्डी प्रमुख अतिथी लाभले आहेत.

डिसेंबर २२ रोजी १, महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल एम. सी. मुथण्णा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथींना मानवंदना, संचलन, विविध साहसी प्रात्यक्षिके, लेझीम,’वेध’ वार्षिक अंकाचं प्रकाशन असा लष्करी थाटात कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमेन असोसिएशन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्यावतीने वर्धापन दिन कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =