You are currently viewing सावंतवाडीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा

सावंतवाडीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा

राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका कॉंग्रेसने तहसीलदार कार्यालया समोर आज जोरदार घोषणाबाजी करून संकल्प करण्यात आला. यावेळी ” राहुलजी को लाना हैं! महेंगाई को हटाना हैं!” , राहुलजी को लाना हैं! देश को बचना है !” अशा घोषणा दिल्या. तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे, तालुका प्रवक्ते अँड. संभाजी सावंत, माजी सरपंच माडखोल संजय लाड, शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस संजय राऊत, विल्यम साल्डाना, जास्मिन लक्ष्मेश्वर, माया चिटणीस, नूतन सावंत, अभय मालवणकर, राकेश चितारी, सुहास सावंत, बबन डिसोजा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 10 =