विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा कार्यालयाला ठोकणार टाळे

विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा कार्यालयाला ठोकणार टाळे

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचा विज वितरण अधिकाऱ्यांना इशारा

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांचे हाल होत आहेत सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोडामार्ग शहरात गेले दोन दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून वारंवार लाइट ये-जा सुरू आहे,नागरिकांची तसेच ऑफिसमध्ये कर्मचारी वर्गाची ऑनलाईन कामे खोळंबली जात आहे.त्यामुळे त्वरित पुरवठा सुरळीत करावा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा