राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार पशुपैदास धोरण

राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार पशुपैदास धोरण

सिंधुदुर्गनगरी 

लिंग विनिश्चिज केलेल्या वीर्यमात्रांचा पशुपालकांनी त्यांचे गायी म्हशींच्या कृत्रिम रेतनामध्ये वापर करण्याचा विचार केल्यास त्यातून 90 ट्टके मादी वासरे निर्माण होण्याची शक्यता वाढते असे डॉ. आर.बी.दळवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

               सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षाच कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनच्या धोरणानुसार केंद्र सहाय्यित (60.40)  राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणास अधिन राहून राज्यातील गायी म्हशींमध्ये शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा वापर जे शेतकरी त्यांच्या गायी, म्हशींना कृत्रिम रेतन करण्याकरिता इच्छूक असतील अशा शेतकऱ्यांकरिता लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रेची किंमत रुपये 575 असून पशुपालन यांनी केवळ रुपये 40 व कृत्रिम रेतन सेवाशुल्क रुपये 41 असे एकूण रुपये 81 अदा करावयाचे आहेत. उर्वरित रुपये 261 केंद्र शासनाचा हिस्सा व रु 174 राज्य शासनाचा हिस्सा आहे. तर उर्वरित 140 पैकी जेथे दूध संघामार्फत 100 व जेथे दूध संघ कार्यरत नाही अशा ठिकाणी खर्च महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून करण्यात यावयाचा आहे. लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा राज्यातील सहकारी खाजगी दुध संघाना प्रत्येकी रुपये 181 प्रति वीर्यमात्र या दराने पुरवठा केला जाणार आहे. पशुपालकाकडून कृत्रिम रेतनापोटी रुपये 40 व कृत्रिम रेतन सेवाशुल्क रुपये 41 असे एकूण रु 81 या पेक्षा जास्त सेवाशुल्क आकारणी दुध संघांना करता येणार नाही .

                सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पशुपालक यांनी त्यांचेकडील गायी म्हशींना लिंग विनिश्चित केलेल्या वीर्यमात्रांचा वापर करुन कृत्रिम रेतन करुन घेण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ आर.बी.दळवी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा