You are currently viewing मान.कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे उद्या सावंतवाडीत

मान.कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे उद्या सावंतवाडीत

*मान.कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे उद्या सावंतवाडीत*

*वीज ग्राहक संघटनेशी करणार चर्चा*

*बैठकीसाठी जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकारी राहणार उपस्थित*

माननीय कार्यकारी अभियंता श्री.तनपुरे उद्या गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजता सावंतवाडी येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांशी सावंतवाडी तालुक्यातील विविध उपकेंद्र अंतर्गत असलेल्या समस्यांबाबत चर्चा करणार आहेत. या बैठकीसाठी जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा सचिव निखिल नाईक, तालुका समन्वयक श्री बाळासाहेब बोर्डेकर, तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्री जगदीश मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, उपाध्यक्ष आनंद ने, सचिव संजय नाईक यांच्यासह तालुका कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती सावंतवाडी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने विभाग वार बैठका घेत तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. सदरच्या विभागवार बैठका दाणोली, बांदा, आंबोली, कलंबीस्त आदी उपविभागांमध्ये झालेल्या असून सदर बैठकीत ग्राहकांनी अनेक समस्या मांडल्या होत्या. सदरच्या समस्या उद्याच्या बैठकी मध्ये उपस्थित राहणाऱ्या माननीय कार्यकारी अभियंता महावितरण कुडाळ, श्री तनपुरे साहेब यांच्यासमोर मांडायच्या असल्याने सदर गावातील सरपंच, उपसरपंच आणि कार्यकारणी सदस्यांनी उद्याच्या बैठकीसाठी उपकार्यकारी अभियंता सावंतवाडी यांच्या कार्यालयात सायंकाळी 4.00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन सावंतवाडी वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =