You are currently viewing मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणासाठी 30 जून पर्यंत अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी

सागरी मत्स्यव्यवसाय,  नौकानयन व डीझेल इंजिन देखभाल व परिचय असे 6 महिन्यांचे प्रशिक्षण  मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येते. यंदाच्या वर्षी दिनांक 1 जूलै ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणसाठी इच्छुकांनी दिनांक 30 जून 2021 रोजी  पर्यंत मत्सयव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण  यांच्याकडे अर्ज करावेत असे आवाहन रत्नाकर प्रभाकर राजम यांनी केले आहे.

      या प्रशिक्षणाबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे. कालावधी, दिनांक 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर2021 ,पात्रता, अमेदवारांचे वय 18 ते 35 असावे(आधार कार्ड व रेशन कार्ड ची छायाप्रत जोडणे) उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक,शाळा सोडल्याचा दाखलाची छायाप्रत जोडणे आवश्यक.क्रियाशील मच्छीमार व किमा 1 वर्षाचा मासेमारीचा अनुभव असावा विहित नमुन्यातील अर्जावर मच्छीमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी.उमेदवारास पोहता येणे आवश्यक.  शुल्क, सहा महिन्याचे रुपये 2 हजार 700 मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रुपये 600 मात्र. दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला आवश्यक . रोजगार संधी, राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसाहाय घेवून नौका बांधता येते. सागरी नौकेवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलबध होवू शकते.

              इच्छूक युवकांनी स्वत:च्य हस्ताक्षरात भरलेली विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 30 जून 2021 पर्यंत कार्यालयाच्या वेळेत, कामकाजाच्या दिवशी सादर करावेत. र.प्र. राजम मत्सयवयसाय प्रशिक्षण अधिकारी, मत्सयव्यसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग मालवण मो. 9421264438, अ.ग. बोधले 9665143935, सहाय्य्क आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय, बँक ऑफ इंडीयाच्या समोर, सोमवार पेठ, मालवण.असे रत्नाकर प्रभारकर राजम मत्स्यव्यसाय प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग मालवण यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा