जुलै पासून धावणार एक्सप्रेस गाड्या..

जुलै पासून धावणार एक्सप्रेस गाड्या..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. मध्य व दक्षिण पश्चिम रेल्वेकडून देखील राज्यभरात बंद असलेल्या सर्व रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने रेल्वेकडून सर्व विभागांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

मार्च मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, हुबळी – कुर्ला एक्सप्रेस, कोल्हापूर – नागपूर एक्सप्रेस, यशवंतपूर – निजामुद्दीन एक्सप्रेस, निजामुद्दीन – वास्को गोवा एक्सप्रेस या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता कोयना एक्सप्रेस वगळता सर्व एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

 

दिल्लीतही अनलॉक सुरू झाल्याने यशवंतपुर – निजामुद्दीन एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. आता गोवा – निजामुद्दीन एक्सप्रेस देखील लवकरच सुरू होणार आहे. मध्य आणि दक्षिण पश्चिम रेल्वेकडून सध्या तरी एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याचे नियोजन आहे. परंतु पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची आणखीन वाट पाहावी लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा