You are currently viewing दोडामार्ग कोविड केअर सेंटरला ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कळणे मायनिंग कडून भेट

दोडामार्ग कोविड केअर सेंटरला ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कळणे मायनिंग कडून भेट

दोडामार्ग :

 

दोडामार्ग कोविड केअर सेंटरला कळणे मायनिंग कंपनी कडून बुधवारी ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. कंपनी व्यवस्थापन आणि तहसीलदार यांच्यात कोविड १९ ची तालुक्यातील गंभीर परिस्थिती आणि सोयीसुविधांची कमतरता याबाबत चर्चा झाली होती. त्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून ३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तहसीलकडे सुपूर्द करण्यात आले.

नायब तहसीलदार एन. एन. देसाई यांच्या हस्ते ते कॉन्सन्ट्रेटर कोविड केअर सेंटर कडे देण्यात आले. यावेळी मायनिंग कंपनीचे प्रतिनिधी गोविंद जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी मेघा कासार्डेकर, आरोग्य सहायक गजानन भणगे,कार्यक्रम सहायक अजित सावंत,मंडळ अधिकारी राजन गवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =