You are currently viewing सावंतवाडीतही आठ दिवस जनता कर्फ्यू जाहीर करावा- ऍड. निरवडेकर

सावंतवाडीतही आठ दिवस जनता कर्फ्यू जाहीर करावा- ऍड. निरवडेकर

सावंतवाडीत व्यापारी संघटनेला आवाहन

सावंतवाडी

व्यापारी संघटनेने पुढाकार घेवुन सावंतवाडीत जनता कर्फ्यू जाहिर करावा, अशी मागणी ऍड. अनिल केसरकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे. शहरात आतापर्यंत १६० कोरोना रुग्ण आढळले असून, त्यापैकी ५८ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा आता स्पष्ट होवू लागल्या असून ही पूर्ण यंत्रणाच वाढत्या रुग्ण संख्येमुळे वेंटिलेटरवर आहे. जिल्हा रुग्णालयात पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन,वेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत. त्यामुळे अलीकडच्या २/४ दिवसात काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील रुग्णसंख्या झपाटयाने वाढत असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळेनासे झालेले आहेत.
सावंतवाडी शहर व आजूबाजूच्या परिसरात वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याअगोदर तातडीने ८ दिवसांचा शहरात जनता कर्फ्यू जाहीर करावा व त्यासाठी व्यापारी संघटनेने सर्वांना विश्वासात घेवुन निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =