You are currently viewing प्रधानमंत्री आवास व रमाई घरकुल योजनेतर्गत प्रायोगिक तत्वावर घरच्या किल्ल्या सुपूर्त…

प्रधानमंत्री आवास व रमाई घरकुल योजनेतर्गत प्रायोगिक तत्वावर घरच्या किल्ल्या सुपूर्त…

कणकवली

महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रम पंचायत समिती कणकवली येथे मनोज रावराणे सभापती, प्रकाश पारकर उपसभापती, मिलिंद मेस्त्री पं.स. सदस्य, अरुण चव्हाण गटविकास अधिकारी उच्चश्रेणी वर्ग-1, व मा. श्री अभिजीत हजारे सहाय्यक ग.वि.अ. तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रधानमंत्री आवास व रमाई घरकुल योजनेतर्गत प्रायोगिक तत्वावर घरच्या किल्ल्या सुपूर्त करण्यात आल्या

यावेळी रमाई आवास योजना लाभार्थी दिनकर सोमा कदम आशिये व प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थी ज्ञानेश्वर रघुनाथ येंडे फोंडाघाट यांना ईगृहप्रवेश कार्यक्रमा निमित्त चावी देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 1 =