You are currently viewing पीक कापणी प्रयोग जिल्ह्यात ४०४ गावांमध्ये

पीक कापणी प्रयोग जिल्ह्यात ४०४ गावांमध्ये

सिंधुदुर्गनगरी:

 

जिल्ह्यातील भात कापणी प्रयोगासाठी ३४१, तर नागली पीक कापणी प्रयोगासाठी ६३ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समन्वय समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारऱ्यांचे सनियंत्रण या पूर्ण पीक कापणी प्रयोगांवर राहणार आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नियोजनानुसार पीक कापणी प्रयोगांची कार्यवाही निर्धारित वेळेत करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिल्याची माहिती जिल्हा सल्लागार अरुण नातू यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे उपस्थित होते. यावेळी भात पीक कापणी प्रयोगाकरिता महसूल यंत्रणेकडील तलाठ्यांकडे ११४ गावे, जि. प. यंत्रणेकडील ग्रामसेवकांकडे ११४ गावे तसेच भात नागली पीक कापणी प्रयोगाकरीता कृषी विभागाकडील कृषी सहाय्यक यांच्याकडे १७६ गावे निश्चित करून देण्यात आली आहेत. पीक कंपनी प्रयोगाद्वारे मिळणारी उत्पन्नाची आकडेवारी विश्वासार्ह व अचूक येण्यासाठी संबंधित गावचे पोलीस पाटील, ग्रा. पं. सदस्य व गावांतील प्रगतिशिल शेतकरी यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षण अधिकारी यांनी पीक कापणी प्रयोगांचे पर्यवेक्षण करावे, असे नातू यांनी प्रशिक्षणवर्गात स्पष्ट केले. २५ ते २८ जुलै या कालावधीत तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती सदस्यांसाठी प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय प्रशिक्षणवर्गात सातारा कृषी अधीक्षक कार्यालयाचे तंत्र अधिकारी श्री. नलावडे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी शरद कालेल, जिल्हा सांख्यिकी अधिकारी अ. आ. कुलकर्णी, राष्ट्रीय नमुने सर्वेक्षण संस्था कोल्हापूरचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा