You are currently viewing फोंडाघाट प्रा. आ. केंद्रात उद्यापासून बाह्य रुग्ण तपासणी सुरू – डॉ. जंगम

फोंडाघाट प्रा. आ. केंद्रात उद्यापासून बाह्य रुग्ण तपासणी सुरू – डॉ. जंगम

कणकवली :

मागील अनेक दिवसांपासून बंद असलेली फोंडाघाट मधील बाह्य रुग्ण सेवा अखेर उद्यापासून सुरू होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोनाचा गावात वाढता प्रादुर्भाव आणि काही खाजगी डॉक्टर तसेच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. याच पार्श्वभूमीवर फोंडाघाट बाजारपेठ मधील आरोग्य सेवा पूर्णता ठप्प झाली होती. फोंडाघाट मध्ये स्वॅब सेंटर सुरू केल्यामुळे येथील प्रथम वैद्यकीय अधिकारी सचिन जंगम यांची नियुक्ती स्वॅब कलेक्शन साठी केली होती.

त्यातच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना झालेली कोरोनाची लागण यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण तपासणी बंद करण्यात आली होती. गावातील खाजगी दवाखाने देखील बंद असल्यामुळे फोंडाघाट तसेच पंचक्रोशीमधील आरोग्यचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र आज स्थानिक रुग्ण कल्याण सामिती आणि जिल्हा परिषद सदस्य संजय आग्रे यांच्या उपस्थितीत आरोग्य विषयी तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सरपंच संतोष आग्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश पटेल रुग्ण कल्याण सामिती च्या महिला सदस्य माधवी दळवी यांच्यासह काही पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी स्वॅब देण्यासाठी साठी फोंडाघाट तसेच कनेडी, नांदगाव, कासार्डे येथील रुग्ण येत असल्याने त्याचा ताण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होत असल्याने त्याचे तालुका स्तरावर नियोजन करावे. त्याचप्रमाणे गृह विलगिनीकरन केलेल्या रुग्णांना सेवा देण्यात यावी यासाठी कर्मचाऱयांमार्फत रुग्णाची तपासणी करण्यात यावी प्रसंगी आरोग्य अधिकारी यांचा सल्ला घेऊन मार्गदर्शन करावे.

त्याचप्रमाणे फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असल्याने प्रथम वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाह्य रुग्ण सेवा सुरू करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत रुग्णांना सेवा देतेवेळी काही साधन सामुग्री चा अभाव जाणवत असल्यास ग्रामपंचायतीकडे मागणी करावी ग्रामपंचायत मार्फत त्या पद्धतीत उपलब्धता करून देण्यात येईल असे आश्वासन सरपंच संतोष आग्रे यांनी दिले. अशा विविध विषयांवर चर्चे अंती उद्यापासून बंद असणारी आरोग्य सेवा सूरु करण्याचे आश्वासन वैद्यकीय अधिकारी सचिन जंगम यांनी उपस्थितांना दिले.सर्व पदाधिकारी यांनी एकत्र येत गावातील रुग्ण सेवा सुरू केल्याबद्दल सर्वसामण्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =