गावात गावातील विलिनीकरण कक्षाचे उद्घाटनासाठी फिरण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ महिला रुग्णालय परिस्थिती सुधारावी…..

गावात गावातील विलिनीकरण कक्षाचे उद्घाटनासाठी फिरण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ महिला रुग्णालय परिस्थिती सुधारावी…..

कुणाल किनळेकर जिल्हाध्यक्ष मनविसे सिंधुदुर्ग

गेले काही दिवस कुडाळ मधील महिला रुग्णालय येथील कोविड सेंटर मधील स्टाफ अंतर्गत वादातून काम सोडून गेलाय.  तसेच पुरेसे डॉक्टर सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. हे कमी की काय म्हणून एखाद्या वेळी कोविड रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर ची गरज भासल्यास रुग्णांना ऑक्सीजन किंवा व्हेंटिलेटर हे रोजंदारीवर काम करणारे कामगार किंवा स्वतः पेशंटच्या नातेवाईकांना लावावे लागत आहेत.
अशी भयंकर परिस्थिती असताना आपले कुडाळ- मालवणचे आमदार मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करण्याची गरज असताना आपल्या मतदार संघातील ग्रामपंचायतींनी स्वखर्चाने उभारलेल्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात धन्यता मानत आहेत.

मुळात कुडाळ महिला रुग्णालयाची तिनशे बेडची क्षमता असुनही पैकी सत्तर बेडचेच कोविड सेंटर आमदारांनी मोठ्या गाजावाजात उद्घाटन करुन सुरू केले आणि आत्ता ते बंदही करत आहेत.
त्याचप्रमाणे मालवण मधील रंगरंगोटी करून उद्घाटन करण्यात आलेले कोविड सेंटरही अजून सुरू झालेले नाही.
कुडाळ-मालवणच्या जनतेला नुसतीच उद्घाटने निवेदने आणि स्वतःचेच सत्कार सोहळे करून घेऊन बसण्यापेक्षा आमदार वैभव नाईक यांनी प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था सुधारुन जनतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे काहीतरी करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा