सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक भारतीने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट…

सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षक भारतीने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट…

प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा ; ३१ मार्च पर्यंतचे प्रस्ताव ३० जून पर्यंत मंजूर करण्याचे आश्वासन…

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती-सिंधुदुर्ग च्या वतीने शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नियोजित भेट संपन्न झाली.यावेळी आंबोकर यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्तावाबाबत बोलताना ३१ मार्च २०२१ पर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव ३० जून २०२१ पर्यंत मंजूर करण्यात येतील.असे आश्वासन दिले.
या भेटीच्या वेळी संजय कोळी यांचे मेडिकल बिल, नेहा नितीन गव्हाणकर यांच्या डी सी पी एस हप्ता कपात रकमेबाबत व पंकज तांबोरे यांच्या स्थायी आदेशातील दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळा मध्ये जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, कणकवली तालुका अध्यक्ष दशरथ शिंगारे, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल, जिल्हा प्रतिनिधी लहू पाटील व कणकवली तालुका संघटक संजय कोळी व शिक्षण विभागातील अधीक्षक विनायक पिंगुळकर, लक्ष्मण डोईफोडे, लिपिक संदीप जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा