कुडाळ एसटी बस डेपोच्या नजीक ट्रकला अपघात..

कुडाळ एसटी बस डेपोच्या नजीक ट्रकला अपघात..

कुडाळ

वैभववाडी येथून निघालेला मुंबई- गोवा हायवेवर कुडाळ शहराच्या दिशेने कुडाळ एसटी बस डेपोच्या नजीकच्या रोडवरून टाटा कंपनीच्या /MH.07-X.1044 या ट्रकला अपघात झाला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे भरलेल्या सिमेंटच्या गोण्या होत्या. ट्रकचे स्टेरिंग लॉकझाल्यामुळे चालक ट्रक आवरू शकला नाही. त्यामुळे रोडच्या साईडला असलेल्या शेतजमिनीत ट्रक कोसळला.

या ट्रक मध्ये  ड्रायव्हर,  क्लीनर सह आणि दोन हमाल होते. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रकचे बरेच नुकसान झाले. हा अपघात सकाळी ८.वाजण्याच्या सुमारास झाला. ट्रकमधील ड्रायव्हर, क्लीनर आणि हमाल हे सुखरूप आहेत. दुसरा ट्रक मागवून अपघात गाडीतील माल ट्रान्स्फर करण्यात आला

प्रतिक्रिया व्यक्त करा