You are currently viewing सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णवाहिका वाटपात जिल्ह्यावर अन्याय

सार्वजनिक आरोग्य विभागाकडील रुग्णवाहिका वाटपात जिल्ह्यावर अन्याय

कुडाळ :

 

अलीकडील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णवाहिकांच्या माध्यमातून राजकीय श्रेयवादाची लढाई व कुरघोडीच्या ज्या घटना पहायला मिळाल्या ते पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कोविड महामारीने वैफल्यग्रस्त जनतेची थट्टा करत असून ते या कोरोना आपत्तीबाबत खरंच गंभीर आहेत का असा सवाल जनमानसातून उपस्थित होत आहे. महाराष्ट्र शासचा आरोग्य विभाग 500 रुग्णवाहिका खरेदी करतो आणी त्यातील जिल्ह्याच्या वाटेला फक्त 9 रुग्णवाहिका येतात हा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय नाही का..?राज्यात इतर ठिकाणी राज्यमंत्री पालकत्व करत असलेल्या जिल्ह्यांना तुलनेने अधिक रुग्णवाहिका मिळतात मात्र वरीष्ठ कॅबिनेट मंत्र्यांचे पालकत्व असलेल्या सिंधुदुर्गला वाटाण्याच्या अक्षता दिल्या जातात ह्यातून शिवसनेनेचे जिल्ह्याप्रती असणारे प्रेम किती ढोंगी आहे हे सिद्ध होते. शिवाय राज्य शासन व खनिकर्म निधीतून प्राप्त 21 रुग्णवाहिकांपैकी सावंतवाडी व कणकवली मतदार संघात प्रत्येकी 8 तर कुडाळ-मालवणच्या वाट्याला 5 येतात,आणी तरीही सन्माननीय आमदार महोदय गप्प राहतात हे दुर्दैवी आहे.एकीकडे काही ठिकाणी 2011-12 च्या रुग्णवाहिका अकार्यक्षम झाल्या म्हणून त्या जागी नवीन रुग्णवाहिका दिल्या जातात तर दुसरीकडे 2005 सालची पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अगदी अखेरची घटका मोजत असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जातो हा प्रशासनाचा दुजाभाव नाही का..?रुग्णवाहिका वाटप करताना आरोग्य केंद्रांना नेमके कोणते निकष लावले गेले याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.पणदूर आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका न मिळणे हे स्थानिक परिसरातील पक्षातीत उच्च पदस्थ जि.प.सदस्यांचे देखील अपयश असून कार्यक्षमतेची प्राचितीच आहे. कुडाळचा विचार केला तर फक्त एका माणगाव आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका मंजुरी देऊन जिल्हा प्रशासनाने रुग्णवाहिका वाटपात कुडाळ तालुक्यावर केलेला अन्याय कुडाळवासीय सहन करणार नसून यापुढील काळात प्रशासनाशी संघर्ष अटळ आहे असा सूचक इशारा मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =