You are currently viewing भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तर्फे ओवळिये येथे विविध समाजोपयोगी उपक्रम

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तर्फे ओवळिये येथे विविध समाजोपयोगी उपक्रम

सावंतवाडी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा तर्फे ओवळिये येथे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सागर सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी ओवळिये गावात रोगप्रतिबंधक फवारणी केली, तसेच मुख्य मार्गावरील खड्डे श्रमदानातून बुजवण्यात आले. रस्त्याची साईडपट्टी दुरुस्त करण्यात आली, तसेच पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यात आले, ओवळिये मुख्य मार्गावरील हा पुल कमी उंचीचा असून पुलाच्या दोन्ही बाजूला चढाव व तीव्र वळणे असल्याने सदर पुलाची उंची वाढवून नविन पुल बांधणे गरजेचे आहे. ग्रामस्थांची हि अनेक वर्षापासूनची मागणी अद्यापही पुर्ण न झाल्याने सागर सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी उपसरपंच श्वेता सावंत, ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत, तारामती नाईक, पंकज सावंत, यश सावंत, प्रदिप सावंत, गोट्या सावंत, संकेत सावंत, रोहन सावंत, झिलु सावंत, विकास सावंत, विक्की सावंत, हनुमंत सावंत, श्यामसूंदर सावंत, ओमप्रकाश सावंत, भाग्यदिप सावंत, मयूर जाधव, विवेक सावंत, सूरज सावंत, शिवराम सावंत आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 17 =