You are currently viewing दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

सिंधुदुर्ग :

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यात ७ वर्षापर्यंतच्या गटात सानवी शशांक भिंगार्डे (देवरुख) – प्रथम, नाविन्य सचिन डोळस (मसुरे-मालवण) – द्वितीय, वेदिका दिपक जाधव (आळंदी देवाची).

८ ते १० वर्ष वयोगटात दुर्वा जयसिंग घाडी ( बांबर्डे – कुडाळ) – प्रथम, शमिका सचिन चिपकर (कुडाळ) – द्वितीय, संस्कार सिद्धार्थ कांबळे (राधानगरी).

११ ते १४ वयोगटामध्ये प्रेरणा सचिन खेडेकर (नागवे – कणकवली) – प्रथम, तनुश्री प्रसाद मसुरकर (फोंडाघाट – कणकवली) – द्वितीय, गौरी प्रसाद सावंत (कुडाळ) – तृतीय.

१५ ते १८ वयोगटामध्ये वेदांत लक्ष्मण सावंत (पाट – कुडाळ) – प्रथम, विराज गणेश आरावंदेकर (दाभोली – वेंगुर्ले) – द्वितीय, आर्थिका संजय उपाध्ये (चंद्रपूर) – तृतीय.

खुल्या गटामध्ये बबन वसंत पाटील (राधानगरी) – प्रथम, तनया संतोष रेडकर (आरोस) – द्वितीय, प्रतीक्षा गजानन सावंत (शिरोडा) – तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेमध्ये राज्यातील ७ वर्षापर्यंत गटामध्ये २४, ८ ते १० वयोगटा मध्ये १०१, ११ ते १४ वयोगटामध्ये ११७, १५ ते १८ वयोगटामध्ये ३२ तसेच खुल्या गटामध्ये २४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेमध्ये कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुतार तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या इतर सदस्यांनी नियोजन केले होते. ही स्पर्धा जुलै मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून महेश गावडे व सुभाष मोहिते यांनी काम बघितले. यशस्वी स्पर्धकांचे दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग मार्फत अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 11 =