You are currently viewing त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना अखेर वेतन मिळणार

त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना अखेर वेतन मिळणार

सावंतवाडी :

एसटी सेवेचे रोजंदारीवर असलेले वाहक चालकांना कोरोना लॉकडाऊन काळातील वेतन देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने मंत्रालय स्तरावर केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. सावंतवाडी शहरातील सुमारे 150 कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळणार आहे, अशी माहिती सावंतवाडी कामगार सेनेने अध्यक्ष अजित कदम यांनी दिली. पूर्व काळात एसटीचे प्रवासी सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे रोजंदारी गट क्रमांक एक व गट क्रमांक दोन अशा वाहक-चालक कर्मचाऱ्यांच्या लॉकडाऊन हजेरी सुनिश्चित करण्याच्या स्पष्ट सूचना नसल्याने हजेरी देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. एलडीपी देण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सावंतवाडी कामगार सेनेने परिवहन मंत्री अनिल परब विभागीय वाहतूक नियंत्रक यांच्याकडे पाठपुरावा केला. प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना समवेत सावंतवाडीचा अध्यक्ष अजित कदम आणि सचिव आर. के .जाधव पदाधिकाऱ्यांनी मंत्रालय स्तरावर प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =