चौकुळसह सहा गावे कोरोना मुक्त..

चौकुळसह सहा गावे कोरोना मुक्त..

आंबोली :

गेले दीड महिना कोरोनाशी यशस्वीपणे लढा दिल्याने चौकुळसह अन्य सहा महसुली गावे गुरुवारी कोरोना मुक्त झाल्याचे चौकुळ सरपंच सुरेश उर्फ बाबू शेटये  यांनी जाहीर केले. चौकुळ आणि चौकुळच्या इतर सहा महसूल गावात बुधवारपर्यंत जवळपास 45 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. तेथील ग्रामस्थांनी तसेच सर्व स्तरातील कर्मचाऱ्याने कोरोनाविरोधी लढा देऊन तो यशस्वी करून दाखवले. त्याचे चौकुळ सरपंच बाबू शेटये म्हणाले ‘यापुढेही एखादे कुटुंब पॉझिटिव्ह झाले तर आणि होम क्वारंटाईन आणि कुटुंबातील सदस्य पॉझिटिव्ह झाले. तर त्यांना आंबोलीतील सैनिक स्कूल मधील विलगीकरण कक्षा ठेवण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास चौकूळ येथे सर्व शाळा सज्ज ठेवण्यात आले आले आहेत. लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता ग्रामपंचायत किंवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच शेट्ये यांनी केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा