ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यातील काही गावांना स्थलांतराच्या नोटीसा

ढगफुटीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यातील काही गावांना स्थलांतराच्या नोटीसा

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यात येत्या 11 ते 13 जून या कालावधीत ढगफुटी प्रमाणे जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने तुळस पलतड, केळुस, श्रीरामवाडी, कोचरे येथील जोखीम क्षेत्रातील सुमारे 60 कुटुंबाना त्यांच्या सोयीनुसार उपलब्ध असलेल्या शासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होण्याच्या नोटीसा या भागातील तलाठी मार्फत देण्यात आल्या आहेत.

तुळस पलतड येथे दरडी कोसळून व केळुस, कोचरे, श्रीरामवाडी येथे नदीचे पाणी लोकवस्तीत घुसून जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा