बांद्यात मराठा समाजाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न…

बांद्यात मराठा समाजाच्या कार्यकारिणीची सभा संपन्न…

विविध विषयांवर चर्चा; १६ सप्टेंबर रोजी पुन्हा बैठकीचे आयोजन…

बांदा :

बांदा मराठा समाज कार्यकारिणीची सभा समाजाचे अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडली. या सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच मराठा समाज आरक्षणाला न्यायालयात स्थगिती मिळाल्याने दशक्रोशीतील बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी बुधवार दिनांक १६ रोजी सकाळी १० वाजता येथील नट वाचनालय सभागृहात बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती या विषयावर प्रामुख्याने यावेळी चर्चा करण्यात आली. आरक्षण मिळण्यासाठी सरकारवर दबावतंत्राचा वापर करावा, असा निर्णय घेण्यात आला आणि याबाबत लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

बैठकीला कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर सावंत, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, खजिनदार राकेश परब, सहसचिव राजेश सावंत, विराज परब, साई सावंत, दीपक सावंत, शैलेश गवस आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा