कुडाळ पंचायत समिती समोर सेवानिवृत्ती शिक्षकांचे धरणे

कुडाळ पंचायत समिती समोर सेवानिवृत्ती शिक्षकांचे धरणे

*कुडाळ*

सेवानिवृत्त शिक्षक दिलीप भगवान कदम यांचा निवृत्तीवेतन मंजुरी आदेश मिळवण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक प्रतिनिधी संबंधित शिक्षक कदम यांच्यासह बुधवारी कुडाळ पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. श्री कदम यांचे निवृत्तीवेतन आदेश प्राप्त झाले तरी संबंधित अधिकारी व कार्यासन कर्मचारी यांच्या हेतूपुरस्पर विलंब करण्याच्या कार्यपद्धती चा निषेध करून यावेळी निषेध आंदोलन छेडण्यात आले. अखेर पंचायत समिती शिक्षण विभागाने निवृत्तीवेतन मंजुरी आदेश देण्याबाबत असे लेखी पत्र दिल्यानंतर दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले.

कुडाळ गटशिक्षणअधिकारी यांच्याकडील मे 2021 मध्ये भरणे गावातील उपशिक्षक दिलीप कदम उच्चश्रेणीशिक्षण अधिकारी मुख्याध्यापक जयश्री म्हडदळकर  व विस्तार अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे असे एक अधिकारी व दोन शिक्षक सेवानिवृत्ती झाले.

जोपर्यंत मंजुरी आदेश मिळत नाही तोपर्यंत हलणार  नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. दरम्यान निवृत्ती वेतन आदेश प्राप्त झाले तरी संबंधित अधिकारी व कार्यासन कर्मचारी यांच्या हेतूपुरस्पर विलंब करण्याच्या कार्यालयीन पद्धतीचा निषेध करण्यात आल्याची माहिती शिक्षण प्रतिनिधींनी दिली. उपोषणकर्ते सेवानिवृत्त शिक्षक दिलीप कदम शिक्षक प्रतिनिधी चंद्रकांत अणावकर, सुरेश पेडणेकर, रवींद्र मुसळे या उपोषणात सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद वारंग, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार आणि कणकवली तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण, कडावल विभागीय अध्यक्ष किशोर तांबे, तालुका संपर्क प्रमुख संतोष वारंग, तालुका सल्लागार संजय गवस आदींसह सहशिक्षण संघटना प्रतिनिधींनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. सभापती सौ नूतन आईर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान दुपारी पंचायत समिती शिक्षण विभागाने कदम यांच्या निवृत्तीवेतन मंजुरी आदेशाची प्रत दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष प्रसाद वारंग यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा