You are currently viewing नाम.दीपक केसरकर यांच्या नम्र कार्यकर्त्यांनी खास.विनायक राऊत यांच्या कार्यकर्त्यांचे केले हसतमुखाने स्वागत

नाम.दीपक केसरकर यांच्या नम्र कार्यकर्त्यांनी खास.विनायक राऊत यांच्या कार्यकर्त्यांचे केले हसतमुखाने स्वागत

*दोडामार्ग वनविभागाच्या विश्रामगृहावर आले आमने सामने*

 

दोडामार्ग  :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शांत संयमी आणि कल्पक नेतृत्व म्हणून नाम.दीपक केसरकर यांची ओळख आहे. नाम.दीपक केसरकर यांच्याप्रमाणेच त्यांचे कार्यकर्ते देखील नम्र असल्याचा प्रत्यय आज दोडामार्ग येथील वन विभागाच्या विश्रामगृहावर शिंदे गटाचे कार्यकर्ते व ऊबाठा सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले त्यावेळी दिसून आले. दोन्ही गट एकाच ठिकाणी एकाच वेळी उपस्थित झाल्याने काहीतरी विपरीत घडेल अशी शंका येत असतानाच, दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना हसत हसत हस्तांदोलन केल्याने दुरावले तरी मनाने तुटलेले नसल्याचे दिसून आले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज रात्री १०.०० वाजता भेडशी येथे दिपावली निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने भेडशी येथील वनविभागाचे रेस्ट हाऊस केसरकर यांच्यासाठी आरक्षित होते. नाम.केसरकर येणार म्हणून कार्यकर्त्यांनी देखील विश्रामगृहावर गर्दी केली होती. गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर आदी वनविभागाच्या विश्रामगृहावर कार्यकर्त्यांसह उपस्थित असताना, अचानक ८.०० वाजता खासदार विनायक राऊत यांचा ताफा पोचला. बाबुराव धुरी यांनी दोडामार्ग तालुक्यातील मोबाईल टॉवरच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून खास. विनायक राऊत यांना भेडशी येथील त्याच दिपावलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणले होते. वनविभागाच्या विश्रामगृहावर अचानक खासदारांचा ताफा पोचल्याने केसरकर यांचे कार्यकर्ते काहीसे बिथरले, मात्र दोन्ही गटांकडून कोणतीही विपरीत घटना न घडता दोन्ही नेत्यांचे जुने स्नेहसंबंध यावेळी जुळुन आले. विश्रामगृहाच्या बाहेर गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर यांच्याशी खासदारांच्या सोबत आलेल्या सौ.जान्हवी सावंत, बाळा गावडे यांनी हसत हसत हस्तांदोलन केले. त्यामुळे नेत्यांच्या भांडणात कार्यकर्ते पक्षातून फुटले तरी मनाने मात्र आजही एकमेकांच्या सोबत असल्याचा प्रत्यय आला.
खास.विनायक राऊत यांच्या विजयासाठी गेल्या लोकसभा निवडणुकीत दोडामार्ग येथील चाळोबाला चार पायांचा नवस केला होता. यावेळी मोबाईल टॉवरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळोबाचा नवसही फेडल्याचे समजले. पुढील लोकसभा निवडणूक लढविण्या पूर्वीच देवाचा नवस फेडून पुढच्या तयारीला कार्यकर्ते लागल्याचे एकंदर चित्र दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 + five =