ईश्वर रूप

ईश्वर रूप

आभाळा एवढेच
प्रेम माऊलीचे
न करी कोणी
बरोबरी
वात्सल्य
मूर्ती
ती

स्थान तिचे नेहमी
हृदयी असावे
मनमंदिरी
जन्मदाती
पूजन
भाग्य
रे

माता पिता पहिले
रूप ईश्वराचे
देती आनंद
जगण्यात
सर्वस्व
लुटे
ते

(दिपी)✒️
दीपक पटेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा