कोकण रेल्वे मार्गावर ईलेक्टीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग

कोकण रेल्वे मार्गावर ईलेक्टीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला आग

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कुडाळ

कोकण रेल्वे मार्गावर कुडाळ- झाराप दरम्यान तेर्सेबांबर्डे गेट जवळ ईलेक्टीक काम करणाऱ्या स्पेशल गाडीला बुधवारी सकाळी ९.३० ला आग लागली. तेर्सेबांबर्डे गेट जवळ ईलेक्टीकचे काम चालू असताना कोकण रेल्वेच्या काम करणाऱ्या बोगीला अचानक आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी कुडाळ एमआयडीसी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. या लागलेल्या आगीत बोगीचे आणि दुरूस्ती साहित्याचे नुकसान झाले आहे.
कोकण रेल्वेच्या मुख्य मार्गावर ही घटना घडल्याने राजधानीसह, जनशताब्दी, मांडवी या रेल्वे अडकून पडल्या असून कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा