You are currently viewing भाजपा, सावंतवाडी ग्रामीण आंबोली मंडळ मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांना आज पासुन सुरुवात…

भाजपा, सावंतवाडी ग्रामीण आंबोली मंडळ मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांना आज पासुन सुरुवात…

सावंतवाडी प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी, सावंतवाडी ग्रामीण आंबोली मंडळ मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांना आज पासुन सुरुवात केली जाणार आहे.
१४ सप्टेंबर २०20 रोजी स्वच्छता मोहीम, आंबोली जिल्हा परिषद स्थळ माऊली मंदिर, आंबोली येथे राबविली जाणार आहे.
१७ सप्टेंबर 2020 रोजी
फळ वाटप कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र तळवडे, सांगेली व आंबोली
आणि स्वच्छता मोहीम वेर्ले, फणसवडे येथे राबविली जाणार आहे.
२० सप्टेंबर २०20 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम जि प तळवडे, कोलगाव, माडखोल, आंबोली येथे होणार.

यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते, युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सदस्य, सर्व मोर्चा व आघाडी प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत चारही जिल्हा परिषदांमध्ये सेवा सप्ताह कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सेवा सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात आजपासून आंबोली येथून होणार असल्याची माहिती
तालुकाध्यक्ष : संदिप एकनाथ गावडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + nine =