पंछी बनो उडते फिरो… आमदार दीपक केसरकरांचा शिरोड्याच्या डोक्यावरून उडता दौरा – ग्रामस्थ ताळकळत!!

पंछी बनो उडते फिरो… आमदार दीपक केसरकरांचा शिरोड्याच्या डोक्यावरून उडता दौरा – ग्रामस्थ ताळकळत!!

शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची नाराजी

आमदार दीपक केसरकरांचे शिरोड्यावरचे प्रेम कमी झाले, यामागे आमची काहीतरी चूक नक्की असेल. पण तो राग एवढा पण असू नये की एक लोकप्रतिनिधी म्हणून शिरोडा गावही आपल्याच मतदारसंघात येते हे ही विसरून जावे. दीपकभाई महान आहेत. स्वतः येत नसतील तर निदान उडत्या दौऱ्यात त्यांची सावली तरी शिरोड्यावर पडू द्यावी, असे उपरोधीक आवाहन शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केले आहे.

काल आमदार दिपकभाई केसरकर यांनी नियोजित दौऱ्यात शिरोडा रुग्णालय भेटीचा उल्लेख केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य व इतर लोकप्रतिनिधी, तसेच हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या समस्या मांडण्यासाठी एका तासापेक्षाही जास्त वेळ ताटकळत थांबले होते. परंतु आमदार केसरकर हे आरवली वैद्यकीय व संशोधन केंद्र येथे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेऊन शिरोडा हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण असल्याचे निमित्त करुन पुढे रेडी येथे निघून गेले. किमान शिरोडा उपजिल्हा रुग्णालयासाठी व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करण्याची घोषणा तरी आमदार करतील, अशी आशा बाळगणाऱ्या शिरोडावासीयांचा केसरकरांच्या या वर्तनाने भ्रमनिरास झाला असल्याचे श्री मनोज उगवेकर म्हणाले. आमदार साहेबांच्या राजकीय यशाची उंची नक्की वाढावी, पण थेट शिरोड्याच्या डोक्यावरून फारच उंचीवरून त्यांनी उडता प्रवास करू नये. निदान आपल्या कामाची सावली तरी शिरोड्यावर पडू द्यावी, असे उगवेकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा