“वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही”

“वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी कमी पडु दिला जाणार नाही”

संदेश पारकर यांची ग्वाही

“पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून खनिकर्म विभागामार्फत वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्य अशी रुग्णवाहिका आज मिळाली आहे. या रुग्णवाहिकेचा फायदा जवळच्या सर्व गावांना होणार असुन रुग्णांना अधिक जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला यापुढेही लागेल तेवढा निधी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून दिला जाईल,” अशी ग्वाही रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.

यावेळी जि.प.सदस्या स्वरुपा विखाळे, कलमठ सरपंच वैदेही गुडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली वळंजू, शिवसेना कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, माजी सरपंच निसार शेख, ग्रा.प सदस्य राजु राठोड, सदस्या धनश्री मेस्त्री, रामदास विखाळे, धनंजय सावंत, परेश आचरेकर, सचिन आचरेकर, विनय हडकर, वरवडे शाखाप्रमुख विजय कडुलकर, शिवराम परब, रमेश निर्गुण, अमित शेट्ये, सुधीर सावंत, आशा प्रवर्तक निलिमा लाड यांच्यासह स्टाफ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि संदेश पारकर यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा