You are currently viewing आडवली समर्थ गड येथे नृत्य स्पर्धा…

आडवली समर्थ गड येथे नृत्य स्पर्धा…

२४ मार्च एकेरी नृत्य तर २७ मार्च समूह नृत्य स्पर्धा…

मालवण

तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, समर्थगड-आडवली येथे २३ ते ३० मार्च २०२३ या कालावधीत श्री स्वामी जयंती उत्सव निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२४ मार्च ला रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ७ हजार रुपये, ५ हजार रुपये, ३ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रत्येकी सन्मान चिन्ह तसेच उतेजनार्थ क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार आहे. २७ मार्च ला रात्री ९ वाजता जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे १५ हजार रुपये, १२ हजार रुपये, ९ हजार रुपये रोख पारितोषिक व प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि उतेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी सिताराम सकपाळ (९४२०२१०२६२), प्रकाश गवस (९४०३३५०८४९), अतुल घाडीगावकर (९४२११७४१३३), समीर घाडीगावकर (९३५९५०८१२१)

येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थमठ समर्थगड- आडवली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा