युवा रक्तदाता संघटना ठरतेय कोरोनात ‘ब्लड बँक’..

युवा रक्तदाता संघटना ठरतेय कोरोनात ‘ब्लड बँक’..

सावंतवाडी

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठरलेली रक्तदान शिबिरे रद्द झाली. त्यामुळे रक्तपेढीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा होऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय व सावंतवाडी रुग्णालयमधून लागोपाठ रक्तासाठी फोन येत आहेत. त्यात युवकांनी लस घेतल्यामुळे सर्वसाधारण रक्तगटाचा रक्तदाता सुद्धा शोधणे जिकरीचे जात आहे. अशा परिस्थितीत देखील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी रक्ताच नात जपत आहेत.

अथक प्रयत्न करून कमी वेळात रक्तदाते उपलब्ध करुन देत आहे. त्यात आतापर्यंत सलग ३ दिवस O + या रक्तगटाचे ३ रक्तदाते वेगवेगळ्या रुग्णालयमध्ये ॲडमिट असलेल्या रुग्णांना उपलब्ध करुन दिले. आशिष साखळकर, हर्षल भांगले, वैभव कोरडे यांनी हे रक्तदान केल. तर गोवा बांबोळी इथ B + रक्ताची आवश्यकता असताना वैभव दळवी, रोशन राऊळ यांनी गोवा मेडीकल काॅलेज बांबोळी येथे जाउन पुढाकार घेत रक्तदान केल. तसेच ह्या महिन्यांमधील शिबीरातील कार्ड रक्तासाठी गरजू गरीब रुग्णांना वाटप केली. याच प्रमाणे रक्तदाते, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, मेडीसीनसाठी रुग्णमित्र म्हणून युवा रक्तदाता संघटनेच निस्वार्थी पणे काम सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा