You are currently viewing पिठाची गिरण चालू करत असताना शॉक लागून सुप्रिया प्रमोद परब यांचे निधन..

पिठाची गिरण चालू करत असताना शॉक लागून सुप्रिया प्रमोद परब यांचे निधन..

मालवण :

मालवण तालुक्यातील वेरळगावचे पोलीस पाटील प्रमोद परब यांच्या पत्नी सौ. सुप्रिया प्रमोद परब यांचे गुरुवारी ३ जून रोजी पिठाची गिरण चालू करत असताना शॉक लागून निधन झाले. त्यांचं घराणं हे फौजदारी घराणं म्हणून आज ओळखलं जातं. त्या मनमिळाऊ होत्या त्यांच्या आकस्मिक निधनाने वेरळ गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात नवरा, २ दीर, मुलगा, मुलगी, सासू, सासरे, असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा