You are currently viewing कोकणात येणारे गणेशभक्त ‘वेटिंग’ लिस्ट वर…

कोकणात येणारे गणेशभक्त ‘वेटिंग’ लिस्ट वर…

गणपती विशेष गाड्यांच्या घोषणेकडे चाकरमान्यांना लक्ष द्यावे लागणार..

सिंधुदूर्ग :

लाडक्या बाप्पाचे यंदा थाटात स्वागत करता यावे, यासाठी चाकरमान्यांनी आतापासूनच तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाला १०० दिवस उरलेले असतानाच कोकण मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादीने २५० चा टप्पा पार पोहोचली आहे. यामुळे यापुढे केवळ नियमित आणि गणपती विशेष गाड्याच्या घोषणेकडे चाकरमान्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

यंदाचा गणेशोत्सव जोशपूर्ण वातावरणात साजरा होण्याची शक्यता आहे. १० सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. किमान एक दिवस किंवा आगमनाच्या दिवशी गावी पोहोचावे, असा मुंबईकरांचा प्रयत्न असतो. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचे रेल्वेला मागणी असतेच. चाकरमान्यांची पसंतीची असलेली दादर-सावंतवाडी विशेष गाडीतील ९ सप्टेंबरची स्लीपर क्लास ची वेटींग लिस्ट पूर्ण झाल्याने बंद करण्यात आली आहे. १० सप्टेंबरच्या प्रवासासाठी प्रतीक्षा यादी २५३ च्या वर पोहोचली आहे. जनशताब्दी गाडीतील ९ सप्टेंबरची ‘टू टायर एसी’ची प्रतीक्षा यादी बंद करण्यात आली असून, १० सप्टेंबरची प्रतीक्षा यादी १८० च्यावर गेली आहे.

गाड्या व प्रतीक्षा यादीची स्थिती

 

प्रतिक्रिया व्यक्त करा