You are currently viewing पॉलीटेकनिक प्रवेशासाठी १२ डिसेंबर २०२० पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप फेरी सुरु…..

पॉलीटेकनिक प्रवेशासाठी १२ डिसेंबर २०२० पासून केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप फेरी सुरु…..

सिंधुदुर्गनगरी
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता प्रथम वर्ष आणि थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) फेरी फेरीबाबतचे वेळापत्रक जाहीर झाले असून हि प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे होणार आहे.
ही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया १२ डिसेंबर २०२० पासून सुरु होत आहे. यामध्ये दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागा प्रदर्शित करण्यात येतील. त्यानंतर दिनांक १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२० पर्यंत उमेदवाराने लॉगीनमधून पाठक्रम व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाईन विकल्प भरणे व त्यास निश्चित करणे.
पहिल्या फेरीसाठी तात्पुरत्या जागा वाटप प्रदर्शित दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी होतील. तदनंतर प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी वाटप करण्यात आलेल्या जागेची, त्याच्या लॉगिन मधून स्वीकृती करणे दिनांक १७ डिसेंबर ते १८ डिसेंबर. २०२० पर्यंत. पहिल्या फेरीनंतर जागावाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे दि.१७ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२० (सायं ५.०० वाजेपर्यंत) तसेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया फेरी २ दिनांक २० डिसेंबर २०२० ते २९ डिसेंबर २०२० (सायं ५.०० वाजेपर्यंत)असणार आहे. चालू वर्षी कॅप फेऱ्या दोन होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक फॉर्म भरणे.
पदविका अभ्यासक्रमाचे कॅप फेरीचेबाबतचे सविस्तर वेळापत्रक
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
सदर लिंकवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी एमआयटीएम इंजिनीअरिंग कॉलेज ओरोस, सुकळवाड येथे संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा