फोंडाघाट कोविड  सेंटरला नाडकर्णी कुटुंबियांकडून टीव्ही संच भेट

फोंडाघाट कोविड  सेंटरला नाडकर्णी कुटुंबियांकडून टीव्ही संच भेट

फोंडाघाट

फोंडाघाट येथील कोविड सेंटरला शितल एजंसी च्या संचालिका सौ.शुभांगी अजित नाडकर्णी यांचेकडुन २१” टि.व्ही.सेट भेट म्हणुन देण्यात आला.
रुग्णाना थोडा विरंगुळा म्हणुन अजित नाडकर्णी कुटुंबीयांकडुन ही भेट देण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्या प्रेरणेतुन ही वस्तु दिल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा परीषद अध्यक्ष सौ.संजना सावंत यांनी पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा दिल्या. सभापती मनोज राणे यांनीही कौतूक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा