You are currently viewing निरवडे-कोनापाल येथे पावणे दोन कोटीचा काथ्या क्लस्टर प्रकल्प

निरवडे-कोनापाल येथे पावणे दोन कोटीचा काथ्या क्लस्टर प्रकल्प

सावंतवाडी

सनराईस कॉयर औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून निरवडे -कोनपाल येथे होत असलेल्या सुमारे पावणे दोन कोटीच्या क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून नजीकच्या काळात पाचशेहून अधिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तसेच क्लस्टरच्या माध्यमातून ज्या महिलांना वैयक्तिक युनिट हवे  असेल त्यांना ही १ लाख, ५ लाख, व २५ लाखांची युनिट  उभारून दिले जातील.या माध्यमातून तयार होणाऱ्या मालाच्या विक्रीची जबाबदारी ही संस्था घेणार असल्याने महिलांनी या व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी केले.

सनराईज कॉयर औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा निरवडे येथे झाली.यावेळी ते बोलत होते. निरवडे सरपंच प्रमोद गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा परब, माजी सभापती प्रियांका गावडे, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, सनराईस संस्था अध्यक्ष राखी कळंगुटकर, नीलम संस्था अध्यक्षा गीता परब, सचिव श्रुती रेडकर, संचालिका दिव्या वारंग, सुजाता देसाई, शिल्पा  सावळ, राखी जाधव, ग्रा. पं. सदस्या निकिता बुगडे, माजी सदस्या शीला मांजरेकर, ग्रामसेवक घाडी  आदी उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते काथ्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मळगाव सरपंच व उपस्थित सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.सनराईस संस्थेच्या क्लस्टरसाठी भाड्याने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक दिव्या दत्तात्रय वारंग यांना कल्पवृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + nine =