You are currently viewing पुंडलिक दळवी यांनी मानले जिल्हा प्रशासनाचे आभार

पुंडलिक दळवी यांनी मानले जिल्हा प्रशासनाचे आभार

सावंतवाडी

राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानं सायं ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवार, रविवार वैद्यकीय सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहे. उद्यापासून हा नवा नियम जिल्ह्यात लागू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी १० ते ११ या वेळेत कोरोनाचा वाढता स्प्रेड लक्षात घेऊन वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाकडून नवी नियमावली जाहीर केल्यानंतर पुंडलिक दळवी यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा