You are currently viewing नळपाणी योजनेचे पाणी नदिचे की गटारातले नागरिक हैराण..

नळपाणी योजनेचे पाणी नदिचे की गटारातले नागरिक हैराण..

साटेली-भेडशी मध्ये नागरिकांना गढुळ पाण्याचा पुरवठा..

 

दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यातील साटेली- भेडशी येथे नळपाणी योजनेतुन गेल्या दोन दिवसापासून  नागरिकांना गढुळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे. एक तर आधीच नागरिक कोरोनाने हैराण झाले आहेत. यात हे येणारे गढुळ पाणी त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.

त्यामुळे नळपाणी योजनेचे पाणी नक्की नदिचे आहे की गटारातले अशा प्रश्नाने नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नळपाणी योजनेच्या विहिरीवर फिल्टर बसविण्यात आला आहे की नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक प्रशासनाने यावर तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा