महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या खाजगी कोविड रुग्णालयांवर कारवाई करा…

महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या खाजगी कोविड रुग्णालयांवर कारवाई करा…

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री…

कोविड महामारीचा प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. जिल्ह्यातील जनता या महामारीत भयावह स्थितीत आहे.सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याने खाजगी कोविड सेंटर चा आधार रुग्णांना घ्यावा लागत आहे.खाजगी कोविड रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ पात्र रुग्णांना द्यायचा असुन सदर योजनेचा लाभ रुग्णांना दिला जात नाही. योजनेचे जिल्हा समन्वयक यांनी आरोग्य मित्रांद्वारे योजनेचे प्रबोधन करणे आवश्यक असूनही ते करताना दिसत नाहीत. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचाराची बिले पक्क्या स्वरूपात दिली जात नाहीत.शासनाने ठरवून दिलेल्या बिलाच्या निकशाची अंमलबजावणी न करता मोठया प्रमाणात बिल आकारून बिले घेतली जातात. रुग्णांना डिस्चार्ज देताना पक्की बिले, उपचाराची फाईल दिली जात नाही.
खाजगी कोविड रुग्णालयांच्या या अनागोंधी कारभारा विषयी प्रभारी जिल्हा शल्यचिकिस्तकांशी चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर याची गंभीर दखल घेऊन संबंधित रुग्णालयांवर कारवाई करा अन्यथा मनसेला कायदा हातात घ्यावा लागेल.

यावेळी दया मेस्त्री, प्रणय साटम, संतोष कुडाळकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा