वैभववाडी प्रा. आ. केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका : आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

वैभववाडी प्रा. आ. केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका : आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

पं.स. उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन

वैभववाडी
भाजपा आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली आहे. या रुग्णवाहिकेचे उद्घाटन पंचायत समितीचे उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आले.

यावेळी सभापती अक्षता डाफळे, तहसीलदार रामदास झळके, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पल्लवी झिमाळ, पं.स. सदस्य मंगेश लोके, लक्ष्मण रावराणे, गटविकास अधिकारी शुभदा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी श्री पवार, वैद्यकीय अधीक्षक मनोहर सोनवणे, आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण व पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार फंडातून रुग्णवाहिका दिली होती.

नवीन दोन रुग्णवाहिका दिल्याबद्दल आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे पंचायत समितीने आभार मानले. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस तालुक्यात वाढत आहे. रुग्णांना उपचारासाठी वेळेत पोहोचता यावे, कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आमदार नितेश राणे यांनी प्राधान्याने नागरिकांची रुग्णवाहिकेची मागणी पूर्ण केली आहे. रुग्णवाहिका दिल्याबद्दल वैभववाडीवासियांनी आमदार नितेश राणे, संजना सावंत यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा