You are currently viewing कोरोना मृत रुग्णांवर होणार दोडामार्गात अंतिम संस्कार

कोरोना मृत रुग्णांवर होणार दोडामार्गात अंतिम संस्कार

मदतीसाठी तरुणांनी यावे पुढे ; प.स.सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांचे आवाहन..

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील कोरोना मुळे मृत झालेल्या व्यक्तींचे अंतिम संस्कार करणे आता कठीण होत असून यासाठी शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी अशा मृतदेहावर दोडामार्ग तालुक्यातच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी समाजकार्यात आवड असलेल्या तरुणांना मदतीचे आवाहन केले आहे.

त्यांनी अशा समाजकार्यात आवड असलेल्या तरुणांना आवाहन करताना म्हटले आहे की, आपल्या दोडामार्ग तालुक्यातील कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची परवड होता कामा नये यासाठी आपण मृतदेहावर दोडामार्ग तालुक्यात अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी शासन नियम, सावधानता ही प्रामुख्याने असेल, अशा कामी पुढे येणाऱ्या तरुणांना आपण मेहनातानाही देऊ, यासाठी माझ्या ९४२१२६५१६८ या नंबरवर संपर्क करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा