You are currently viewing रोटरी व इंडियन रेडक्रॉस सोसायटी पणजी-गोवा कडून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयास १५ ऑक्सिजन सिलिंडर प्रदान

रोटरी व इंडियन रेडक्रॉस सोसायटी पणजी-गोवा कडून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयास १५ ऑक्सिजन सिलिंडर प्रदान

कोरोना रुग्णांना मिळणार मोफत सेवा

वेंगुर्ले
वेंगुर्ले शहर व ग्रामीण भागातील रुग्ण कोरोना संकटामुळे त्रस्त झाले असून, ऑक्सिजन सिलिंडर सुविधेअभावी आरोग्य विषयक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. ही सुविधा गरजू रुग्णांना तातडीने मोफत उपलब्ध होवून, रूग्णांचे जीवन सुरक्षित व्हावे यासाठी रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन सातत्याने प्रयत्न करत होते. वेंगुर्ल्यातील लोकांची अत्यंत आवश्यक असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची ही तातडीची गरज लक्षात घेऊन, २०२०-२१ चे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० गव्हर्नर तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटी पणजी-गोवा चेअरमन रो. गौरिश धोंड यांनी मदतीला धावून येत, १५ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले. ते तात्काळ वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आले.

या सेवेसाठी रोटरी पणजी गोवाचे रो. राजेश साळगावकर यांनी बहुमोल सहकार्य केले. रो. राजेश घाटवळ व रो. सचिन वालावलकर यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला.सदर ऑक्सिजन सिलिंडर सेवा ही वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालयात गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध असून, सिलिंडर वापर करून झाल्यावर त्यांनी पुन्हा वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयात सिलिंडर जमा करावयाचा आहे, असे आवाहन रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे करण्यात आले.

वेंगुर्ला ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. अतुल मुळे, डॉ. व्ही. एम. कोळंबकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, अधिपरीचारीका मांजरेकर यांच्याकडे १५ ऑक्सिजन सिलिंडर रोटरी वेंगुर्ला प्रेसिडेंट गणेश अंधारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, रोटरी वेंगुर्ला मिडटाऊन फाऊंडेशन चेअरमन सचिन वालावलकर, डिसीसी संजय पुनाळेकर, हेल्थ क्युरेटिव्ह चेअरमन राजेश घाटवळ, सेक्रेटरी वसंत पाटोळे, नगरसेवक प्रशांत आपटे, कमलेश सामंत, संजय केरकर उपस्थित होते.यावेळी कोरोना अटी शर्तींचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा