वेंगुर्लेत “आम्ही वेंगुर्लेकर सक्षम अभियान : 6 तज्ञ समुपदेशक, 14 डॉक्टरांचा सहभाग”
स्वनिधीतून ऑक्सिजन, कॉन्सट्रेटर अशी उपकरणे विकत घेऊन केले लोकार्पण
वेंगुर्ले
वेंगुर्ला तालुक्यात माझा वेंगुर्ला’ व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने गेले एक महिना “आम्ही वेंगुर्लेकर सक्षम अभियान” अंतर्गतकोविड बाधित रुग्णांचे दूरध्वनी द्वारे मानसिक व वैदयकीय समुपदेशन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये 6 तज्ञ समुपदेशक, 14 डॉक्टर सहभागी झालेले आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून अत्यावस्थ रुग्णांना किमान रुगणालयात स्थावर होईपर्यंत तातडीच्या सुविधा ऑक्सिजन, कॉन्सट्रेटर इ. उपलब्ध करून देणे ही आजची महत्त्वपूर्ण गरज आहे.या दृष्टीने संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वनिधीतून अशी उपकरणे विकत घेतली असून त्याचे लोकार्पण आज ३१ मे करण्यात आले.
वेंगुर्लेत या सेवेमध्ये रुग्णाची सध्य स्थीती अजमावून गृहावीलगीकरणातील आवश्यक खबरदारी व काळजी घेणे बाबत मार्गदर्शन, मानसिक धीर देणे, प्राथमिक उपचार संदर्भात केस पेपर तयार करणे, डॉक्टर मार्गदर्शनाचे महत्त्व पटवून देणे, रुग्णाला कौटुंबिक डॉक्टर उपलब्ध नसल्यास जोडून देणे. आवश्यकते प्रमाणे पाठपुरावा करणे. इतर अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करणे या बाबी समाविष्ट आहेत.रुग्णांना त्यांच्या मागणी नुसार प्रत्येक 5 रुग्णांमागे 1 डॉक्टर अशा प्रमाणात वैद्यकीय सल्ला व निरिक्षण करिता जोडून देण्यात येत आहे. सेवाभावी डॉक्टरांची टीम शिफारस केलेल्या केस पेपर च्या अनुषंगाने रुग्णांशी दूरध्वनी संपर्क साधून रुग्णाच्या लक्षणा नुसार उपचार मार्गदर्शन व निरिक्षण ठेवत आहेत. हे डॉक्टर त्याना 24 तास तातडीच्या संपर्कासाठी उपलब्ध आहेत.
डॉ प्रल्हाद मणचेकर यांचे मार्गदर्शनाखाली 14 डॉक्टर सामाजिक बंधीलकीतून विनामोबदला ही सेवा देत आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर संपर्क यादी उपलब्ध करून देणे व आवश्यक तेथे शासन स्तरावर समन्वय व सहकार्य करीत आहेत.
या सुरू केलेल्या उपक्रमाला आज 30 दिवस पूर्ण झाले आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील एकूण कोरोना बाधीत 15 प्राप्त यादी मधून 603 रुग्णांचे समुपदेशन केलेले आहे. या मधील डॉक्टर सल्ला व मार्गदर्शनाची गरज असलेल्या 62 रुग्णांना मोफत डॉक्टर सेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच 84 रुग्णांचा आवश्यकतेनुसार पाठपुरावा करण्यात आला आहे. 5 रुग्णांना तातडीचा वैदयकिय सहकार्य करण्यात आले आहे.तसेच 5 रुग्णांना इतर अत्यावश्यक मदत व सहकार्य केलेले आहे.
या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम जाणवत असून मानसिक धीर, व उपचाराचे योग्य मार्गदर्शन या मुळे हा आजार गंभीर होण्यापूर्वी नियंत्रित करण्यास मोठी मदत होत आहे. हा कार्यक्रम राबवीत असताना असे लक्षात आले आहे की रुग्णाला तातडीची सेवा देणारी यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे दैनंदिन वाढता प्रादुर्भाव पहाता हा उपक्रम अधिक गरजेचा व सक्षम करणे आवश्यक आहे. या करिता लोक सहभागातून आम्ही वेंगुर्लेकर सक्षम अभियान हाती घेण्यात येत आहे. या मध्ये अत्यावस्थ रुग्णांना तातडीची सुविधा उपलब्ध करणे, आरोग्य व्यवस्थेच्या मर्यादा ओळखून त्या दूर करण्यासाठी काम करणे, तालुकास्तरावर सक्षम स्वयंपूर्ण कोविड सेंटर स्थापित करणे जेणे करून आपल्या तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला दुसरीकडे धाव घेण्याची पाळी येवू नये. गरीब रुग्णांना रुग्णालयात असतांना औषध ,अन्न गरजेनुरूप पुरविणे अशा सेवांचा समावेश आहे. तरी या उपक्रमात वेंगुर्लेवासीय मित्र परिवारास योगदान देण्यासाठी उद्युक्त करावे असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी तसेच मदत करण्यासाठी
MAZA VENGURLA Saraswat Bank branch VENGURLA
A/c 039100100002615 IFSC : SRCB0000039
संपर्क- मोहन होडावडेकर-+91 9423884516,
कपिल पोकळे-+91 7276887772,
राजन गावडे-+91 94233 01310 यांच्याशी संपर्क साधला असे आवाहन करण्यात आले आहे.